नॉटिंगहॅम – श्रीलंकेत विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यावर सूर्यकुमार यादव व पृथ्वी शॉ हे इंग्लंडला दाखल झाले आहेत.
त्यांना येथेही सात दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असला तरीही इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत या दोघांनाही स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तिसऱ्या कसोटीपासून त्यांच्या निवडीचा विचार केला जाऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. आजपासून दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होणार असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात पुजारा व रहाणे यांना चमक दाखवता आलेली नाही.