पाथर्डी : धर्म, राष्ट्र आणि संस्कृती टिकून त्याची जोपासना करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करून आपली भावी पिढी संस्कारक्षम घडवली, तरच येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला असेल. ज्या घरामध्ये सुसंस्कारी मुले आहेत ते घर श्रीमंत आणि सुखी माणसाचे असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत दादा मोरे यांनी व्यक्त केले.
पाथर्डी येथील वीर सावरकर मैदान या भाजी बाजार तळावर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) आयोजित सत्संग सोहळ्यात चंद्रकांतदादा मोरे यांनी स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोनाली राजळे, डॉ.मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सुरेश आव्हाड, मंगल कोकाटे, स्मिता लाड, प्रशांत शेळके, प्रियंका काळोखे, रमेश हंडाळ, उषाताई पांडुरंग खेडकर, बाळासाहेब गोल्हार, रवींद्र पाथरकर, आनंदकुमार चोरडिया, पंढरीनाथ शिरसाट, दिलीप भांडकर, भाऊसाहेब आंधळे, अँड. विजयकुमार वेलदे, विनायक भापकर, विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते. मोरे म्हणाले, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची खरी ओळख राज्याला निर्माण झाली असून, त्यासाठी सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी राज्यभरात दीडशेहून अधिक स्वामींची केंद्र उभारली. आता तोच वसा आणि वारसा घेऊन गुरुमाऊलींनी हे कार्य सुरू ठेवले आहे. ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे केंद्र उभारले जाते.
त्या ठिकाणच्या गावात, शहरात तसेच परिसरात धर्म, जात, पात, भांडणे व अनैतिक गोष्टी बंद होण्याचे काम केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. स्वामींच्या केंद्रात आलेला प्रत्येक व्यक्तीला दुःख मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न केला जातो. धर्माबरोबर आपले संस्कार टिकण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे.
मधुकर चन्ने, सुनील बांगर, रमेश नजन, रमेश लोखंडे, अभिजीत कुलकर्णी, सागर उर्शिळे, विष्णुपंत चिंतामणी, संजय पालवे, चंद्रकांत वारकड, उत्तम तांबे, सागर चातुर, अजय लबडे, बाळासाहेब सुरवसे आदींनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शैलेश चातुर, सूत्रसंचलन प्रसाद भिसे यांनी करून आभार ज्ञानेश्वर गर्जे यांनी मानले.