बेवारस वासराला प्राणीमित्रांकडून जीवदान

वाई – गुरुवार, 20 जून रोजी रात्री अकराच्या सुमारास औद्योगिक वसाहत वाई येथील कचरा डेपो जवळ दोन बैल जातीची वासरे अनिल लोणकर व विनायक जाधव यांना आढळली. त्यांनी लगेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना व शंकरी कट्ट्याच्या सदस्यांना याबाबतची माहिती दिली.

धारकऱ्यांनी लगेच त्या जागी जाऊन ती वासरे ताब्यात घेतली व शिवप्रतिष्ठानचे धारकरी विशाल मोरे यांच्या गोठ्यात ठेवण्याची सोय केली. गायीला खोंड झाल्यास त्याला जास्त दुध द्यावे लागत असल्याचे कारण पुढे करीत शेतकरी वासराला बेवारस सोडून देतात. अशाच प्रकारे वाई एमआयडीसीतील कचरा डेपोजवळ वासरांना सोडण्यात आले होते.

ही बाब प्राणी मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भटक्‍या कुत्र्यांपासून त्याचे रक्षण केले. चार ते पाच कुत्र्यांचा कळप त्या वासरांवर झडप घालण्यासाठी डुक धरून बसला होता. वाई शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेवून, प्राणी मित्र-स्वप्नील भिलारे, काशिनाथ शेलार यांनी त्वरित वेळेच्या करुणा मंदिर गोशाळेत त्याची व्यवस्था करून नितीन जगताप यांच्या वाहनातून त्याला सुखरूप पोहोचविण्यात आले.

करुणा मंदिराचे विश्‍वस्त दीपक ओसवाल यांनी या वासराना गोशाळेत ठेवून मोलाचे सहकार्य केले. फिरायला येणाऱ्या वाईकर नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)