संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. गुणवत्तेनुसार एकूण 100 उमेदवारांची निवड झाली आहे. या सर्व पात्र उमेदवारांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

या उत्तीर्ण उमेदवारांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमी, केरळमधील इंडियन नेव्हल अकॅडमी आणि हैदराबाद येथील एअरफोर्स ऍकॅडमीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मिलिटरी, नेव्हल आणि एअरफोर्स गटातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे गुणानुक्रमानुसार जाहीर करण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.