बारामती महामार्गासाठी सर्वेक्षण मोहीम

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी): नीरा-बारामती या ४१ किलोमीटर राज्यमार्ग लवकरच राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित होत आहे. हा राष्ट्रीय महामार्ग निरेतून जाणार असून हडपसर,जेजुरी, नीरा फलटण या पालखी मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे बारामतीसह महामार्गालगत असणाऱ्या गावांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. नीरा बारामती राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबत अध्यादेश लवकरच निघणार आहे. सद्यस्थितीला नीरा बारामती रोडच्या दुतर्फा असणा- झाडांची गणना करून त्यांच्यावरती अंक टाकण्यात आलेले आहेत. झाडाचा खोडाचा व्यास (रुंदी) व रस्त्यांची रुंदी मार्गावर असणारी छोट्या, मोठ्या ओढे कालव्यावरील पुलाचेही लांबी, रुंदी, उंची मोजण्याचे काम सुरू आहे. विद्युत खांब रस्त्यांपासूनचे अंतर मोजले जात आहे. राष्ट्रीय महामार्गा प्रशासनाकडून डीपीआर (सर्वे) सुरू आहे. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.