पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी ड्रोनचा वापर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच, त्यास राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. त्यासाठी 1 ते 3 पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला होता. स्टेअरींग कमिटीच्या बैठकीत त्यापैकी एका मार्गास मान्यता दिली. आता त्या मार्गाचे “सर्वंकष प्रकल्प अहवाल’ तयार करण्याचे काम सुरू आहे.