शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांच्या मुद्‌द्‌यावरून चीनला घेरले

संयुक्‍त राष्ट्र – चीनमधील शिनजियांगमधील उईघूर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बुधवारी जर्मनी आणि ब्रिटनचा संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनबरोबर जोरदार संघर्ष झाला. या मुद्दयावर संयुक्‍त राष्ट्रात चर्चा होऊ नये यासाठी चीनने संयुक्‍त राष्ट्रात मोर्चेबांधणी केली असल्याचा आरोप या दोन देशांच्या प्रतिनिधींनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केला.

चीनचे सरकार मानवतेविरूद्ध, शिनजियांगमधील युईघुर आणि इतर अल्पसंख्यांकांचा नरसंहार आणि अन्य वांशिक गुन्हे थांबवत नाही तोपर्यंत आम्ही उभे राहून बोलत राहू. असे संयुक्‍त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी सांगितले. 

यावेळी 50 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिनजियांगमधील उईघूर आणि अन्य अल्पसंख्यांकांचा आश्रय छावण्यांमध्ये छळ केला जात असल्याचा आरोप पाश्‍चात्य देशांकडून केला जातो आहे. चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि या शिबिरांमध्ये धार्मिक अतिरेकीपणाचा सामना करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा दिल्या जात असल्याचे सांगितले आहे.

शिनजियांगमध्ये लोकांवर अत्याचार केले जात आहेत. महिलांचे जबरदस्तीने निर्बिजीकरण केले जात आहे, असे थॉमस-ग्रीनफिल्ड म्हणाल्या. तर तेथे अंदाजे 10 लाख उईघूर आणि प्रामुख्याने मुस्लिम वांशिक अल्पसंख्यकांना मनमानीपणे ताब्यात घेण्यात आले आहे, असे ऍम्नेस्टी इंटरनेशनलचे सरचिटणीस ऍग्नेस कॅलमार्ड यांनी यावेळी सांगितले.

गेल्या आठवड्यात चीनच्या दूतांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून हे आरोप खोटे आणि काल्पनिक असलाचे म्हणून नाकारले. चीनविरोधात कुभांड रचल्याचा आरोपही त्यांनी केला. चीनने देशांना या चीनविरोधात सहभागी होऊ नये’ असे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.