एकूण शंभर मुलांना जन्म देण्याचा दाम्पत्याचा संकल्प
जॉर्जिया : सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर करून एका दाम्पत्याने वर्षभरात वीस मुलांना जन्म दिला असून नजीकच्या कालावधीमध्ये एकूण शंभर मुलांना याच प्रकारे जन्म देण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. या दाम्पत्यातील महिलेचा महिलेचे नाव क्रिस्टिना असे असून ती 28 वर्षाची आहे.
एका वर्षांपूर्वी तिला फक्त एकच मुलगी होती पण आता त्या घरात एकूण एकवीस मुले खेळत आहेत. अन्य कोणत्या महिलेचा गर्भाशयाचा वापर करून मुलांना जन्म देण्याच्या तंत्रज्ञानाला सरोगसी असे म्हणतात.
क्रिस्टिना आणि तिचा 57 वर्षे वयाचा नवरा गेली यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या काही वर्षांमध्ये घरात शंभर मुलांना जन्म देण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांनी दीड कोटी रुपये खर्च केले सध्या घरात असलेल्या वीस मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी सोळा आया नेमल्या आहेत.
या कामासाठी वर्षाला 70 लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यांचे तीन मजली मोठे घर असून त्या घरांमध्ये चार महिन्यापासून 14 महिन्यापर्यंत वय असलेली विविध मुले आहेत. त्याशिवाय ख्रिस्तीनाला तिच्या पहिल्या पतीपासून झालेली एक मुलगी ही या घरात नांदत आहे.