जहाल माओवाद्याचे गोंदियात आत्मसमर्पण

गोंदिया – माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी शासकिय स्तरावर विविध योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. तसेच धडक कारवाई करण्यासोबतच माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. गोंदियात एका जहाल माओवाद्याने आत्मसर्पण केले आहे. जगदीश उर्फ महेश विजय अगणू गावडे असे त्या जहाल नक्षलवाद्याचे नाव आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्‍यातील एक 27 वर्षांचा जहाल माओवाद्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.

मुळचा गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची गावातला जगदीश 2012 मध्ये माओवाद्यांच्या संपर्कात आला. माओवादी त्याला फूस लावून जंगलात फिरायला घेऊन गेले. 2012 पासून जगदीश परत नक्षलांच्या भितीने गावी आलाच नाही. शेवटी त्याने चळवळीत सहभाग नोंदवत तीन पोलिसांचा खात्मा केल्याने त्याला नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य मिलिंद तुमडाम यांचा अंगरक्षक म्हणून नेमले. जगदीशने कुरखेडा कोरची ककोडी दलमध्ये काम केले. नक्षलवाद्यांना स्थानिक तेंदूपत्ता तसेच रस्ते बांधकाम व्यावसायिक पैसे पुरवत असल्याचा गौप्यस्फोट जगदीशने केला आहे.

मात्र येत्या काही दिवसांत पोलिसांच्या माओवाद्यांविरुद्ध होणाऱ्या कारवाया पाहता जगदीशचे आत्मसमर्पण हे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षात गोंदिया जिल्ह्यात 19 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गोंदियाच्या पोलीस अधिक्षक विनिता साहू यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)