नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक राम विलास पासवान यांच्यावर आज हदयशस्त्रक्रिया करण्यात आली.
74 वर्षीय पासवान यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती, आज त्यांच्यावर दिल्लीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गेले काहीं आठवडे ते दिल्लीतील एका खासगी रूग्णालयात दाखल झाले आहेत.
त्यांच्या हदयाच्या संबंधातील गुंतागुंत वाढत गेल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे चिरंजीव लोजपचे नेते चिराग पासवान हे बिहार मधील निवडणूक विषयक बैठका रद्द करून दिल्लीत परतले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिं अदिंनी चिराग पासवान यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.