भोपाळ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सध्या भोपाळमधील हमिदिआ रुग्णालयात दाखल आहेत. कमलनाथ यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बोटांच्या हालचालींच्या वेळी त्यांना त्रास होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. कमलनाथ यांना उजव्या हाताच्या पंजाच्या बोटांची हालचाल करताना त्रास होत होता. सतत बोटदुखी, बोटे वाकवताना त्यांना त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांच्यावर शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली.