नवी दिल्ली – कोहली याने रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक करताना म्हटले की, जबाबदारीने खेळ करताना आक्रमक खेळ कसा केला पाहिजे याचा त्यांनी प्रत्यय घडविला. त्यांनी एकवेळ अशक्य वाटणारा विजय दृष्टिपथात आणला होता. मात्र, नशिबाची साथ मिळाली नाही. त्यानंतर सुरेश रैना यानेसुध्दा आपल्या संघास नशिबाची साथ मिळाली नाही अस म्हटलं आहे.
भारताच्या पराभवावर बोलताना सुरेश रैना म्हणाला की, ‘भारताने हा सामना गमावला असला तरी कोट्यवधी चाहत्यांची मने त्यांनी जिंकली आहेत. जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या संघास नशिबाची साथ मिळाली नाही’.