पुणे- लाॅकडाऊनमुळे अनेक तरुणांनी आपल्या गावाच्या रस्ता पकडला होता. मात्र लाॅकडाऊन वाढत गेलं आणि पोटापाण्य़ाचा प्रश्न सगळ्यांना भेडसावत होते. त्यामुळे अनेक तरुणांनी गावात शेती करण्याचा निर्णय घेतला. निर्णयच घेतला नाही तर शेतीत नवे नवे प्रयोगही सुरु केले.
करमाळा तालुक्यातील छोट्या गावी राहण्याऱ्या सुरेश कुंभार हा गावी यशस्वीरित्या शेती करत आहे. त्यानेे पुण्यातील माॅडर्न काॅलेज मधून गणितात Msc केलं त्यानंतर नाटकाकडे वळला. ललित कला केंद्रातून नाटकाचं शिक्षण घेतं. नाटकाचे प्रयोग, स्पर्धा करत असताना लाॅकडाऊन झालं. त्यामुळे नाटक सोडून गावी परतावं लागलं. आता तो शेतीत रमताना दिसतो आहे.