Suresh Dhas on Dhananjay Munde । बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडमधील गुन्हेगारी, वाल्मिक कराडचे कनेक्शन, खंडणीचे प्रकार या सगळ्याची माहिती चव्हाट्यावर आणणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. याविषयी बोलताना त्यांनी,”मला अजून काही आरोप करायचे आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक दप्तर आहे. ते उद्या-परवा काढणार असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे.
मुंडेंचा राजीनामा घेणे भाजपच्या हातात नाही Suresh Dhas on Dhananjay Munde ।
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्याची मागणी मी कुठे केली? त्यांच्या पक्षाचे आमदार, मोर्चेकरी आणि सगळ्याच लोकांची ती राजीनामाची मागणी आहे. आता त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? हे अजित दादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या हातात आहे. ते भाजपच्या हातात नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना सुरेश धस यांनी, “त्यांनी वर्षभर तरी थोडासं बाजूला व्हायला हवं. तुमच्या पदावर राहण्यामुळे तपासावर परिणाम होणार आहे. ते प्रत्यक्ष परिणाम करणार नाही तर ते अप्रत्यक्ष परिणाम करतील. त्यांच्याकडे ती कला चांगली अवगत आहे. त्याच कलेचा त्यांनी वापर करू नये, म्हणून त्यांनी एक वर्ष बाजूला राहावे, “असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ‘दप्तर’ Suresh Dhas on Dhananjay Munde ।
ते पुढे म्हणाले की, अंजली दमानिया यांच्या आरोपात तथ्य आहे. अंजली दमानिया यांनी काय आरोप केले हे मला माहीत नाही. परंतु, मला अजून काही आरोप त्यांच्यावर करायचे आहेत. माझ्याकडे त्यांच्या विरोधात एक दप्तर आहे. ते मी उद्या- परवा उघडणार आहे. आमचा फोकस हा संतोष देशमुख आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालले पाहिजे. समाजातील इतर गुन्हेगारांना धाक बसला पाहिजे. यापुढे कुठल्याही व्यक्तीने अशी हिंमत करता कामा नये, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
वाल्मिक कराड -धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू
माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र सुरू आहे. मला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. याबाबत विचारले असता षडयंत्र करायची कुणाला सवड आहे? तुम्ही स्वतः असले लोक का पोसले. तुम्हीच म्हणत होते ना आका आमच्या फार जवळचे आहेत. कालपर्यंत जवळ होता आणि आज कसा लांब झाला तो? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला.
हेही वाचा
Chandrakant Patil : संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा चंद्रकांत पाटलांनी घेतला समाचार; म्हणाले “त्यांनी माध्यमांशी बोलण्यापूर्वी साधना करावी”
मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई; वाळू माफियांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर