केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

 

बेळगाव/प्रतिनिधी- बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज दिल्ली येथे निधन झाल्याची माहिती हाती आली आहे. कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचा मृत्यू झाला. या निधनामुळे राजकीय क्षेत्राची प्रचंड हानी झाली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

एक स्वच्छ चारित्र्याचा नेता हरपला अशी प्रतिक्रिया बेळगाव शहर आणि जिल्ह्यातून व्यक्त होत आहे. कन्नड आणि मराठी भाषिकात समतोल साधणारा एक नेता हरपला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त झाली.

२००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा मान त्यांनी मिळवला. यावेळी चौथ्यांदा खासदार झाल्याने त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.