सुरेखा पुणेकरांचा पक्षप्रवेश अन्‌ भाजपा-राष्ट्रवादीत रंगला कलगीतुरा

मुंबई  – लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यावरून दोन्ही पक्षात सुरू झालेले हे वाकयुध्द एकमेकांचे श्रीमुख रंगवण्यापर्यंत पोहोचले आहे.

राष्ट्रवादी महिला कॉमग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावरून टीका केली. त्या म्हणाल्या, आपल्या बोलण्यातून दिसणारे वैचारिक दारिद्रय संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपणच महिलांचा कैवारी आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते.

तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचे वक्तव्य केले त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतो, असा इशारा चाकणकर यांनी दिला.

चाकणकर यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी देखील टोकाची प्रतिक्रिया दिली. मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. कारण अशा वक्तव्यांमुळेच त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. पण गाल सर्वांनाच रंगवता येतात. त्यामुळे, कुणीही अतिरेकी भाषा करु नये. हे योग्य नाही. मी जे म्हणालो होतो ती केवळ मराठीतील एक म्हण आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार आहे, दुसरं काही नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझं वक्तव्यं नीट ऐका, असेही दरेकर यांनी यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.