हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुरेखा भोरडे

वाघोली – वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील माजी उपसरपंच सुरेखा शिवाजी भोरडे यांची हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले.

पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात सुरेखा भोरडे यांच्या निवडीने महिला वर्गात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रदिप वसंत कंद यांच्या हस्ते नियुक्तीबद्दल सुरेखा भोरडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश वारघडे, विजय वाळुंज, शिवाजी भोरडे  आदी मान्यवर व  महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.