Surbhi Jyoti Wedding | ‘नागिन’ फेम सुरभी ज्योतीने सुमित सूरीसोबत लग्नगाठ बांधली आहे. 27 ऑक्टोबरला सुरभीचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. सुरभी व सुमित बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही एका म्युझिक व्हिडिओच्या शूटदरम्यान भेटले होते.
३६ वर्षीय सुरभीने लग्नासाठी उत्तराखंडची निवड केली. येथील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एका रिसॉर्टमध्ये सुरभी आणि सुमित याचं मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न पार पडले. सुरभीने आपल्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. सुरभीने लग्नासाठी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्यावर मॅचिंग ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला. Surbhi Jyoti Wedding |
View this post on Instagram
तर दुसरीकडे सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. सुरभीने “शुभ विवाह 27/10/2024” असे कॅप्शन दिले आहेत. त्यांच्या या फोटोंवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. सुरभीने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या हळदीचे फोटोही शेअर केले आहेत. Surbhi Jyoti Wedding |
सुरभीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘नागिन’, ‘कबूल है’, ‘लौट के कोई आया है’, ‘इश्कबाज’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘गुनाह’, ‘ये जादू है जिन का’, ‘देव’ यासारख्या मालिकांसाठी तिने काम केले आहे.
हेही वाचा:
जम्मू पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ; अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळ्या झाडल्या