सुरत अग्नितांडव : कोचिंग क्लासच्या मालकास अटक 

सुरत – गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आगीप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाने दोषींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासचे मालक भार्गव भूटानी याना अटक केली आहे. याशिवाय इमारतीत बेकायदेशीररित्या तिसरा मजला बांधणारे हर्सुल वेकारिया आणि  जिग्‍नेश बागदारा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून लवकरच अटक करण्यात येणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यातील तात्काळ सर्व ट्युशन क्लासेस बंद करण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेतल्यानंतरच क्लासेस पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच गुजरात सरकारने अहमदाबाद, सूरत, राजकोट, वड़ोदरामधील कोचिंग क्लासेसचे सेफ्टी ऑडिट पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, तक्षशिला इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २० विद्यार्थ्यांचा झाला आहे. तर  २० जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)