‘आता ती वेळ आलीय…’ नववधुने राम मंदिर निर्माणसाठी दान केले कन्यादानात मिळालेले 150000 रूपये

सूरत – अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या श्री राम मंदिरासाठी प्रत्येकजण आपआपल्या परिस्थितीनुसार देणगी देत आहेत. गरीब म्हणतो, माझी झोपडी तयार होईल किंवा नाही होईल पण भगवान श्री रामाचे मंदिर जरूर व्हायला पाहिजे. तसेच श्रीमंत लोकही मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत.

अशातच सूरतमधील एका नववधुने कन्यादानात मिळालेले दीड लाख रूपये राम मंदिरासाठी दिले आहेत. ‘जेव्हा राम मंदिर पाहीन तेंव्हा मला माझे लग्न आठवेल’, असे नववधुने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमधील हिरे व्यापारी भालानी यांची मुलगी ज्वेलरी डिझायनर दृष्टीचा सिद्धार्थ यांच्याशी विवाह झाला. लग्नात कन्यादानात त्यांना दीड लाख रूपये मिळाले. ते सर्व पैसे त्यांनी लग्न समारंभादरम्यानच अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी दान केले आहेत.

राम मंदिरासाठी दीड लाखाचा चेक दिल्यानंतर नववधु दृष्टीने म्हटले की, सर्वजण अनेक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिर निर्माणबाबत विचार करत आहेत. आता ती वेळ आलीय, भगवान श्री रामाचे मंदिर उभारले जात आहे. हा माझ्या जीवनातील गर्वाचा क्षण आहे. मला माझ्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली, असे दृष्टीने म्हटले आहे.

मी स्वप्नात देखील याचा विचार केला नव्हता. मात्र, प्रभू श्री रामाच्या कृपेने मला ही संधी मिळाली. भविष्यात जेव्हा मी अयोध्येला जाईल आणि भगवान श्री रामाचे दर्शन घेईल तेंव्हा मला माझ्या लग्नाची आठवण येईल, असेही दृष्टीने म्हटले आहे.

वऱ्हाडी मंडळींनीही केले दान

नववधुचे हे बोलने ऐकून लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींनीही राम मंदिरासाठी दान दिले. तसेच सूरतमध्ये दररोज अनेक लोक राम मंदिर निर्माणसाठी निधी देत आहेत. येथीलच धनाजी राखोलिया आणि राकेश दुधात यांनी एक दिवसाधीच 11-11 लाख रूपयांची देणगी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.