बारामतीत पुन्हा घड्याळ; सुप्रिया सुळे ‘दीड लाखांच्या’ लीडने विजयी!

बारामती – राष्टवादी काँग्रेस पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विजयी आघाडी घेतली असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून ६७५,५९७ एवढी मतं मिळाली आहेत. यंदा भाजपतर्फे बारामतीतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चांगलीच मतं मिळवत सुळेंचे मताधिक्य कमी केले होते. गेल्या वर्षीच्या निकालांमुळे भाजपने यंदा पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा करत बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली मात्र मतदारांनी सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य दिल्याने भाजपच्या पदरात निराशा पडल्याचे चिन्ह आहे.

सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून १५३,१२७ मतांनी विजय झाला असून त्यांच्या विरोधात उभा राहिलेल्या कांचन कुल यांना ५२२,४७० एवढी मतं मिळाली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here