मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना आज (दि. २९) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत या बद्दल माहिती दिली. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
Received a phone call from Dr Harsh Vardhan to check about my health. Appreciate him checking on my health and well-being: NCP chief Sharad Pawar https://t.co/h0UHOHpoV0
— ANI (@ANI) March 29, 2021
दरम्यान, नुकतंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल काही अपडेट दिले आहेत. “त्यांची प्रकृती उत्तम असून बुधवारी एक शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३१ मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील २ आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे..’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.