‘बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींचा शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेनंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, या आरोपींचे केलेले एन्काऊंटर हे आपल्या यंत्रणेचे अपयश असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया यांनी ट्विट करत याबदद्ल प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं अस त्या म्हणाल्या आहेत. हैदराबाद पोलिसांनी केलेली चकमक ही वादात सापडली आहे. अनेकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी चौकशी पथक पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.