सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट -सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्यात 27 नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, बहुमत चाचणी हंगामी अध्यक्षच घेतील. तसेच या चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, यात कोणतेही गुप्त मतदान नको, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामण्णा यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व आमदारांचा शपथ विधी झाला पाहिजे असा आदेशही न्यायमूर्ती रामण्णा यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे. हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड. तास,थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल. अशा प्रतिकिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.