पुणे (इंदापूर) – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्या मतदारसंघात ऍक्टिव्हली काम करताहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका असो किंवा कार्यकर्त्यांचे मेळावे सुप्रिया सुळे प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात. शरद पवार ज्यावेळी विरोधात जातात त्यावेळी महाराष्ट्राचा एक दौरा करतात आणि त्यानंतर सत्तेत येतात असं सूचक विधानं यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. इंदापूरमधील एका सभेत त्या बोलत होत्या.
शरद पवारांच्या राजकारणाबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, ५५ वर्षातील राजकारणातील २७ वर्षे सत्तेतील आणि २७ वर्षे विरोधातील पण महाराष्ट्राने पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिल विरोधात असल्यावर तर जास्त प्रेम दिल. विरोधात गेल्यानंतर शरद पवार दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गम्मत होते हे माहित नाही परंतु दौरा झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी नमूद केलं.
कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल. रोज सकाळी आम्ही उठलो की पाहायचो की पक्ष सोडून कोण गेला. इतके लोक पक्ष सोडून जात होते की त्याला काही हिशोब नव्हता असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.