Supriya Sule | Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘जनसन्मान यात्रे’चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून ‘शिवस्वराज्य यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला आहे. आज ही यात्रा धाराशिव येथे दाखल झाली आहे.
या यात्रेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. धाराशिव येथे दाखल होताच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर यात्रेची सभा पार पडली.
या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली.
महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता.’ असा टोला देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी लगावला.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अनेक आमदार शरद पवार यांना सोडून महायुतीत सहभागी झाले. अशातच हार न मानता 84 वर्षांचे शरद पवार पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी 10 पैकी 8 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले. आता विधानसभा निवडणुकीतही आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यायला हवेत, असा निर्धार शरद पवार यांनी केलाय.
‘शरद पवारांना ‘पंतप्रधान’, तर सुप्रियाताईंना ‘मुख्यमंत्री’ होऊ दे’