Supriya Sule on Ajit Pawar । आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यात सर्व नेते मंडळी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सर्व नेतेमंडळींकडून राज्याचा दौरा सुरु आहे. दरम्यान , शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या लवकर उठण्याच्या वाक्याचा समाचार घेत आणि पवारांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,”कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. दूधवाला पण उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण तिला चहा करायला लागतो. आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं आहे का? अशा शब्दात अजित पवारांचा समाचार घेतला.
हा आकडा म्हणजे काही विनोद नाही Supriya Sule on Ajit Pawar ।
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे मतदारसंघांमध्ये 5 हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगतात. हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही. सत्ता येत असते जात असते. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार? कोणी कोणावर उपकार करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो.
पवार साहेबांनी असं कधी भाषण केला आहे का? Supriya Sule on Ajit Pawar ।
त्या पुढे म्हणाल्या की, “तुम्ही दिवस-रात्र काम करता म्हणून सांगत असता, तर आम्ही आग्रह केला होता का? तुम्हाला आमदार, खासदार व्हायचं आहे. कष्ट तर सगळेच करत असतात. मात्र, माझ्यामुळे एक डायलॉग बंद झाला, मी सकाळी उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, कारण तिला चहा करून द्यावा लागतो. पवार साहेबांनी असं कधी भाषण केला आहे का? अरे माझं वय काढायचं नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर तोफ डागली. कोणी लवकर उठतो म्हणून दररोज भाषण करत सुटतो का?” अशी विचारणा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली.