“किमान कोरोना काळात तरी सामान्यांना …” सुप्रिया सुळेंनी केली पंतप्रधान मोदींना विनंती!

मुंबई – गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाचं संकट देशाच्या डोक्यावर घोंगावत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊननंतर उद्योगधंदे बंद झाले, दुकानं बंद झाली. त्याचा परिणाम  लोकांच्या रोजगारावर झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगार नसल्यामुळे राहण्याच्या जागेचं भाडं, किराणा, भाज्या अशा गोष्टी विकत घेण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली.  महाराष्ट्रात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीं ( Prime Minister Narendra Modi ) यांच्याकडे आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सर्वसामान्यांना परवडतील अशा पध्दतीने गॅसच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान कार्यालयाला( पीएमओ) टॅग करून ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर रु. 800 च्या पार पोहोचले आहे.अनेकांना ही रक्कम परवडत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.”

पुढे त्यांनी म्हटले आहे की, समाजातील बहुतांश घटक गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहेत. पीएमओ इंडिया (PMO India) आपणास नम्र विनंती आहे की, किमान कोरोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा. अवश्य यावर विचार करुन सर्वसामान्यांना दिलासा द्याल हा विश्वास आहे. धन्यवाद” असं सुप्रिया सुळे या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.