सुप्रिया सुळेंना बारामतीतून ‘सव्वा लाखाची’ आघाडी

पुणे – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली असून सध्या सुप्रिया सुळे ५६१,९६० मतांसह आघाडीवर आहेत त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या उमेदवार कांचन कुल ४३२,४०१ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सुप्रिया सुळे यांनी सध्या १२९,५५९ मतांची भक्कम आघाडी घेतली आहे.

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये कांचन कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. मात्र आता सुप्रिया सुळे पुन्हा एकदा मुसंडी मारताना दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.