दादरमध्ये टॅक्सी चालकाचे सुप्रिया सुळेंशी गैरवर्तन

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आज मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात एका टॅक्सी चालकाच्या मुजोरीचा अनुभव आला. याबद्दल त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. औरंगाबादहून मुंबईत दादरला रेल्वे स्थानकात उतरताना त्यांच्यासोबत ही घटना घडली.

सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणतात की, दादर रेल्वे स्थानकात आज एक विचित्र अनुभव आला. कुलजित सिंग मल्होत्रा नावाचा एक माणूस रेल्वेमध्ये येऊन टॅक्सी घेण्यासाठी विचारू लागला. मात्र, त्याला दोनदा नकार देऊनही त्याने माझी वाट अडवली. मला त्रास दिला, आणि निर्लज्जपणे फोटोही घेण्याचा त्याने प्रयत्न केला.

सुळे यांनी हा सगळा प्रकार आपल्या पुढच्या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिला आहे. या प्रकारात रेल्वे मंत्रालयाने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे, जेणेकरून प्रवाशांना अशा अनुभवांचा सामना करावा लागणार नाही. टॅक्सीचालकांना टॅक्सीसेवेसाठी प्रवाशांना विचारणं कायदेशीर असेल, मात्र रेल्वे स्थानक, विमानतळ या ठिकाणी परवानगी न देता फक्त ठरलेल्या टॅक्सी तळांवरच देण्यात यावी. अस या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी रेल्वे पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×