सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर फोटो केला शेअर
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहे. हिवाळी अधिवेशनाबरोबरच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचीही जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीमध्येही एकमेकांच्या संपर्कात आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे अचानक चर्चेत आल्या आहेत.
राज्यामधील सत्ता स्थापनेवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत खलबते सुरु आहेत. अनेक नेत्यांच्या बैठकी आणि चर्चांचे सत्र राज्याबरोबरच दिल्लीतही सुरु आहेत. त्यामुळेच अनेक नेत्यांचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. असे असतानाही सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवली.
With Chhavi Lal Ji – Attendant from Lok Sabha Secretariat.
How hard people work to make our life easier in Parliament.
Thank you – Chhavi Lal Ji! ☺? pic.twitter.com/6z5c4domAl— Supriya Sule (@supriya_sule) November 20, 2019
सुळे यांचा सायकल चालवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे स्वेटर आणि कानामध्ये हेडफोन्स घालून सुप्रिया सुळे सायकल चालवताना दिसत आहेत. सुळे यांनी ट्विटवरुनही लोकसभा सचिवालयातील सेवक असणाऱ्या चावीलाल या व्यक्तीबरोबरचा सायकलवरील फोटो पोस्ट केला होता. लोकसभेत आम्हाला योग्य पद्धतीने काम करता यावे म्हणून अनेक लोक कष्ट घेतात, असे सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुळे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सचिवालयामध्ये काम करणाऱ्या चावीलाल यांचे आभारही मानले आहेत. दिल्लीमधील प्रदुषणाची मागील अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरु असतानाच तेथे अधिवेशनासाठी गेलेल्या सुप्रिया सुळे वेळात वेळ काढून सायकलिंगला जात आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत.