मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिल्ली हिंसाचाराबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. दिल्लीत जे काही घडले; त्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरायला हवे. नैतिक जबाबदारी स्वीकारून शहा यांनी राजीनामा द्यावा.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी घडलेल्या दिल्लीतील घडामोडी म्हणजे सुरक्षाविषयक प्रचंड त्रुटी आहे. त्या त्रुटीची पारदर्शक आणि नि:पक्षपाती चौकशी करण्याची विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करते, असे सुप्रिया येथील विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.