काकू तुमच्या मुलाला त्रास देणार नाही

केंद्रीय मंत्री सुप्रिया बबूल यांचे ट्विट व्हायरल; पोलिसांत तक्रार नाही

कोलकाता : काकू, कृपया काळजी करू नका. मी तुमच्या मुलाला कोणताही त्रास देणार नाही. फक्त त्याने केलेल्या गैरकृत्यापासून धडा घ्यावा, अशी भावनिक साद केंद्रीय मंत्री सुप्रियो बाबूल यांनी घातली. त्याला सोशल मिडियावर चांगला प्रतिसादही मिळत आहे.

केंद्रीय वन आणि पर्यावरण, हवामान बदल कात्याचे राज्यमंत्री सुप्रियो बबूल एका कार्यक्रमासाठी जाधवर विद्यापीठात आले होते. त्यावेळी डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. मात्र तरीही बबूल यांनी कार्यक्रमाला जाण्याचा निर्धार केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर या नाट्यमय घटनेला सुरवात झाली.

बबूल यांना धक्काबुक्की करतानाचे छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले. त्यावेळी बबुल यांचे केस ओढणाऱ्या कार्यकर्त्याचे छायाचित्र बबूल यांनी ट्विट केले. या मुलाने माझ्यावरील हल्ल्याचे नेतृत्व केले. त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करता हे मला पहायचेच आहे, असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते. हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ते कर्करोगाशी झूंजत असणाऱ्या या मुलाच्या मातेने पाहिले. त्यांनी डोळ्यात पाणी आणूून माझ्या मुलाला माफ करा अशी विनंती प्रसिध्दी माध्यमांद्वारा केली.

बबूल यांनी ही बातमी पाहून पुन्हा ट्विट केले. त्यात ते म्हणतात, काकू काळजी करू नका. मी तुमच्या मुलाला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. त्याने त्याच्या गैरकृत्यापसून धडा घ्यावा. मी त्याच्या विरोधात कोणतीही पोलिस फिर्याद दिली नाही. तसेच कोणालाही करू दिली नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.