राहुल गांधींना ‘सुप्रीम’ दिलासा; नागरिकत्वाच्या मुद्यावरील याचिका फेटाळली 

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांनी याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले. कोणतीही कंपनीने राहुल गांधींना फॉर्मवर ब्रिटिश नागरिक म्हणून नोंद करते. तर असे केल्याने ब्रिटिश नागरिक होणार आहेत का? असा सवालही न्यायाधीशांनी विचारला.

राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणारी याचिका हिंदू फ्रंटचे जयभगवान गोपाळ आणि  हिंदू महासभेचे चंद्रप्रकाश कौशिक यांनी दाखल केली होती. राहुल गांधींनी ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी लावला होता. यामुळे राहुल गांधींना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये तसेच त्यांचे नाव मतदार यादीतूनही वगळण्याची मागणी  याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली होती.

https://twitter.com/ANI/status/1126372969016590336

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)