नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कविता यांना दिलासा देताना ईडी आणि सीबीआय या केंद्रीय यंत्रणांना फटकारले. त्या यंत्रणांनी केलेल्या तपासाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तपास आणि संबंधित प्रक्रिया नि:पक्षपाती असायला हवी. तुम्ही मर्जीनुसार कुणालाही आरोपी बनवाल. हा कसला नि:पक्षपातीपणा? संबंधित प्रकरणात आरोप मान्य करणाऱ्या एका व्यक्तीला साक्षीदार बनवण्यात आले, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.