नवी दिल्ली – व्हॉट्सऍप धोरणाच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. व्हॉट्सऍपने आपल्या प्रायव्हसीच्या संबंधातील धोरण बदलेले असून त्यांनी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे धोरण रद्द करण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
ती आज सरन्यायाधिशांच्या खंडपीठापुढे विचारार्थ आली असता न्यायालयाने त्या विषयात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या विषयावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यामुळे याचिकाकर्त्याने त्यांना सोयीचा मार्ग स्वीकारावा असे नमूद करून कोर्टाने या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला.
या प्रकरणात केंद्र सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत नसल्याने न्यायालयानेच त्यावर निर्णय दिला पाहिजे अशी अपेक्षा या याचिकेत व्यक्त करण्यात आली होती. सोशल मीडिया साईट्सवर केंद्र सरकारचे नियंत्रण असले पाहिजे अशी अपेक्षाही यात नोंदवण्यात आली होती.