मोदी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

प्रतिज्ञापत्रांमध्ये जागेचा तपशील दिला नसल्याचा आरोप
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सादर करण्यात आली. त्या याचिकेत मोदींनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये गुजरातच्या गांधीनगरमधील जागेचा (प्लॉट) तपशील उघड केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील साकेत गोखले नामक व्यक्तीने संबंधित याचिका सादर केली आहे. त्या याचिकेनुसार, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्‍टोबर 2002 मध्ये त्यांना राज्य सरकारच्या धोरणानुसार गांधीनगरमध्ये प्लॉट देण्यात आला. मोदींनी 2007 मधील विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्या प्लॉटचा उल्लेख केला. मात्र, 2012 आणि 2014 मधील निवडणुकांवेळच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांनी मालमत्तेसंबंधीच्या तपशीलात त्या प्लॉटचा उल्लेख केला नाही. त्या प्लॉटच्या मालकीशी संबंधित नोंदी सादर करण्याचा आदेश गुजरात सरकारला द्यावा. तसेच, मोदींच्या मालमत्तेची आणि विशेषत: त्या प्लॉटच्या संदर्भातील चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.