supreme court on UGC-NET Exam । सर्वोच्च न्यायालयाने आज UGC-NET परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांनी १८ जून रोजी घेण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. दरम्यान , न्यायालयाच्या निर्णयानुसार 21 ऑगस्ट रोजी पुन्हा UGC-NET परीक्षा होणार आहे.
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी या याचिकेवर सुनावणी केली. त्यांनी यावेळी,”9 लाख लोक परीक्षा देणार आहेत. त्यांना अनिश्चिततेत सोडले जाऊ शकत नाही.” असे म्हटले. जूनमध्ये घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत सीबीआयचा तपास सुरू आहे, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत. यूजीसी नेट परीक्षा 18 जून रोजी घेण्यात आली होती, परंतु परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती सरकारला मिळाल्याने दुसऱ्याच दिवशी ती रद्द करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता वाढेल supreme court on UGC-NET Exam ।
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने, “परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याच्या निर्णयाला दोन महिने उलटले आहेत. अशा परिस्थितीत याचिकेवर विचार केल्यास विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता वाढेल आणि अराजकतेचे वातावरण निर्माण होईल.” असे नमूद केले.
सरन्यायाधीश पुढे म्हणाले, “हे अंतिम होऊ द्या, आम्ही आदर्श जगात राहत नाही. 21 ऑगस्टला परीक्षा होऊ द्या, विद्यार्थ्यांसाठी निश्चितता असली पाहिजे.” खंडपीठाने सांगितले की 9 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत आणि केवळ 47 याचिकाकर्त्यांनी त्यास आव्हान दिले आहे.
त्रुटीचे इनपुट मिळाल्यानंतर परीक्षा रद्द supreme court on UGC-NET Exam ।
दरम्यान, UGC-NET 2024 ची परीक्षा 18 जून रोजी झाली होती, ज्यामध्ये 9 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. शिक्षण मंत्रालयाने 19 जून रोजी परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. मंत्रालयाने सांगितले की, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटच्या माध्यमातून परीक्षेत काही अनियमितता झाल्याची माहिती देण्यात आली होती, त्यानंतर ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले.
हेही वाचा
कचरा जाळताना भयंकर स्फोट ; मणिपूरमध्ये आमदाराच्या पत्नीचा मृत्यू