नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित प्रकरणात सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरणाच्या (सॅट) आदेशाविरुद्धची सेबीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.
वास्तविक, नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्समध्ये कथित हेराफेरीशी संबंधित प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) अंबानी व इतर दोन पक्षांना दंड ठोठावला होता.
तो सॅटने फेटाळा होता. याविरोधात सेबीने सुप्रीम कोर्टात अपील केले होते. न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. आर. महादेवन यांचे खंडपीठ म्हणाले, आम्हाला सॅटच्या आदेशात हस्तक्षेप करायचा नाही.