कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्याची परवानगी, पण…

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. मात्र, कार्ती यांना ते भेट देणार असलेल्या परदेशी ठिकाणांचा तपशील देण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, त्यांना 2 कोटी रूपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कार्ती हे माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांचे पुत्र आहेत.

एअरसेल-मॅक्‍सिस व्यवहार आणि आयएनएक्‍स मीडिया प्रकरणी कार्ती यांच्यावर विविध गुन्हे याआधीच दाखल करण्यात आले आहेत. त्या प्रकरणांची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयकडून केली जात आहे. कार्ती यांना याआधी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनला जाण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.