कोंढवा दुर्घटनेची सुप्रिया सुळेंकडून पाहणी

पुणे – बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये एका खाजगी सोसायटीची संरक्षण भिंत पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी दुर्घटना स्थळाला भेट दिली. या दुर्घटनेमध्ये संरक्षक भिंतीचा मलबा मजुरांच्या झोपड्यांवर पडल्याने १५ मजुरांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सुळे यांनी या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

यानंतर सुळे यांनी आज दुपारी थेट घटनास्थळी दाखल होतं उपस्थितांशी चर्चा केली. सुप्रिया सुळे या घटनास्थळाला भेट द्यायला आल्या असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील पाहणी करण्यासाठी आले असल्याने दोघांनी सदर घटनेबाबत काही वेळ चर्चा केली.

सुप्रिया सुळे यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करतानाच सरकारने बांधकाम संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here