मतदानाची तारीख जसजशी जवळ यायला लागली आहे तस तसे लोकसभा निवडणुकीचे रान तापायला लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे पहिल्या टप्यातील मतदान ११ एप्रिल होणार असून भाजपसह सर्व पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच ओडिशातल्या पुरी मतदार संघातून पक्षाचे आक्रमक प्रवक्ते संबित पात्रा यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संबित पात्रा थेट जनतेला भेटून भाजप पक्षाचा प्रचार करत आहे. यातच लोकसभा निवडणुकीसाठी संबित पात्रा यांना बॉलिवूडसुद्धा समर्थन करत आहे. बॉलीवुडचे सुप्रसिद्ध अभिनेता ऋषि कपूर यांनी ट्विटद्वारे संबित पात्रा यांना समर्थन केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी संबित पात्रा यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
This is to wish and bless my friend Sambit Patra all the best and success in the coming elections!
— Rishi Kapoor (@chintskap) April 4, 2019