केरळमध्ये आपचा डाव्या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने (आप) केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्या पाठिंब्याबद्दल डाव्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आपचे आभार मानले आहेत.

आपचे सोमनाथ भारती आणि माकपचे निलोत्पल बसू यांची शनिवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये आप डाव्या आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्राच्या सत्तेतून हटवणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, आपने केरळचे संयोजक सी.आर.निलकंदन यांना निलंबित केले. निलकंदन यांनी केरळमध्ये आपचा कॉंग्रेसला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. आपच्या नेतृत्वाशी सल्लामसलत न करता ती घोषणा केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.