भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच खेळणार

#ENGvIND 5th Test : रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफ राहणार विलगीकरणातच

लंडन – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांच्यासह सपोर्ट स्टाफला पुढील दहा दिवस विलगीकरणातच राहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील मॅंचेस्टर येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीत भातीय संघ प्रशिक्षकाविनाच सहभागी होणार आहे.

रॅपिड अँटीजन चाचणीत शास्त्री यांना करोना झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी त्यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील अन्य चार व्यक्तींनाही आता दहा दिवस विलगीकरणातच राहावे लागणार आहे. सोमवारी त्यांची आरटी पीसीआर चाचणीही करण्यात आली व त्यातही ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर बीसीसीआयने संपूर्ण संघाला मॅंचेस्टर कसोटीत प्रशिक्षकांशिवाय खेळण्याची सुचना केली आहे.

इंग्लंडविरुद्धचा पाचवा व अखेरचा कसोटी सामना येत्या शुक्रवारपासून मॅंचेस्टर येथे खेळला जाणार आहे. शास्त्री यांच्या संपर्कात आलेले सपोर्ट स्टाफचे तीन सदस्य गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांनाही विलगीकरणातच राहावे लागणार आहे.

रविवारी सकाळी व सोमवारी सकाळी झालेल्या दोन चाचण्यांत खेळाडूंना मात्र, करोनाची बाधा झाली नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सहाय्यक कर्मचारी आणि सर्व खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस यापूर्वीच मिळाले असल्याने पुन्हा लसीकरणाची गरज नसल्याचेही सांगितले जात आहे. भातीय संघ राहात होता त्याच हॉटेलमध्ये शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. त्याचवेळी त्यांना ही बाधा झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.