कोविडशी लढण्याकरिता कंपन्यांची साथ; ‘फोक्‍सवॅगन’, ‘स्कोडा’कडून नऊ कोटींचा निधी

बंगळुरू – भारतातील करोना संसर्गाचे प्रमाण पाहता केंद्र व राज्य सरकारबरोबर आता कंपन्याही आपल्या परीने योगदान करीत आहेत. फोक्‍सवॅगन आणि स्कोडा या कंपन्यांनी यासाठी नऊ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. स्कोडा ऑटो फोक्‍सवागन इंडिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गुरुप्रताप बोपाराय यांनी सांगितले की या रक्‍कमेचा उपयोग संसर्ग रोखण्यासाठी व उपचारासाठी केला जाणार आहे.

मारुती कार कंपनी
मारुती कंपनीने सध्याच्या काळात ग्राहकांना मदत व्हावी याकरिता आपल्या काही ग्राहकांचा फ्री सर्विस आणि वारंटी कालावधी वाढविला आहे. 15 मार्च ते 30 मे या काळात ज्यांची वारंटी संपत होती त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

किर्लोस्कर मोटर कंपनी
असाच निर्णय टोयोटा या कंपनीने घेतला आहे. नागरिकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये देखभालीसाठी वाहन वितरकाकडे आणणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती पाहून आम्ही मोफत देखभालीचा कालावधी एक महिन्याने वाढला असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी सांगितले.

ग्लोबल स्कूल फाउंडेशन
ग्लोबल स्कूल फाउंडेशनने कोव्हिडग्रस्त रुग्णांसाठी 500 हून अधिक ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे योगदान दिले आहे. ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर्स गावखेड्यांपर्यंत पोहोचावीत यासाठी सेवा इंटरनॅशनलच्या स्थानिक स्त्रोतांचा वापर करण्यात येणार आहेत. ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनचे चेअरमन अतुल टेमुरनिकर म्हणाले, ही उपकरणे हॉस्पिटल्समध्ये किंवा सामाजिक संस्थांनी मदतीसाठी उभारलेल्या केंद्रामध्ये वापरली जाऊ शकतील. यापूर्वी 2020 च्या सुरुवातीला पंतप्रधान निधी – पीएम केअर्स फंडला 1.1 कोटी रुपये मदत केली होती. 23 इंटरनॅशनल स्कूल्स चालवणारी ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी बरेच योगदान देणारी संस्था आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.