भारताच्या अस्थायी सदस्यत्वासाठी 55 देशांचा पाठिंबा; पाकिस्तानलाही द्यावा लागला पाठिंबा

संयुक्त राष्ट्रात भारताला मोठे राजकीय यश

नवी दिल्ली – आशिया-पॅसिफिक संयुक्त राष्ट्र समूहाने 2021-22 या दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अस्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे भारताने केलेल्या राजकीय कोंडी मुळे पाकिस्तानलाही भारताच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात भारताला एक मोठे राजकीय यश मिळाले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते घेतला आहे. याबाबतची माहिती भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्‌विटद्वारे दिली आहे. सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, एक सर्वसमावेशक पाऊल, आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते भारताच्या 2021-22 या दोन वर्षांच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी उमेदवारीस पाठिंबा दिला आहे. सर्व 55 देशांना या पाठिंब्यासाठी धन्यवाद.

ज्या 55 देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, चीन, इंडोनेशिया, इराण, जापान, कुवैत, किर्गिजस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, व्हिएतनाम, नेपाळ, श्रीलंका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान, सिरियासह पाकिस्तानचाही समावेश आहे. भारत आतापर्यंत सात वेळा अस्थायी सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर निवडून गेला आहे. या परिषदेचे पाच स्थायी सदस्य असून त्यामध्ये चीन, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)