करोना लसींचे पेटंट सोडण्याला पाठिंबा वाढला; अमेरिका आणि फ्रान्सनेही दिला दुजोरा

भारत, दक्षिण आफ्रिकेची "डब्लूटीओ'कडे मागणी

जिनिव्हा, दि 6 – करोना लसींवरील पेटंटमध्ये सवलत देण्यात यावी, या मागणीला अमेरिकेसह फ्रान्सने ही पाठिंबा दिला आहे. गरीब देशांना लसींचे अधिक डोसउपलब्ध व्हावेत आणि करोनाची साथ लवकर संपण्यास मदत व्हावी यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये जागतिक व्यापार संघटनेकडे ही मागणी केली होती.

अमेरिका, युरोपीय संघ आणि फ्रान्सने जरी या मागणीला पाठिंबा दिला असला तरी, त्यामध्ये अजून अन्य अडथळे बाकी आहेत. विकसित देशांनी या मागणीला विरोध दर्शवला आहे. आता या संदर्भात अन्य देशांच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी गुरुवारी पेटंट खुले करण्याबाबत अनुकूल मग व्यक्त केले आहे. मात्र आफ्रिकेसारख्या देशातील औषध कंपन्या कोबड लस देणगी म्हणून देण्यास तयार होतील की नाही, याबाबत त्यांनी शंका व्यक्त व्यक्त केली. त्याऐवजी लसीचे डोस देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही या मागणीला आपले समर्थन असल्याचे म्हटले आहे.

लसींचा पुरवठा वाढण्यासाठी ते आवश्‍यक असल्याचे बायडेन म्हणाले. युरोपियन संघाच्या आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेन यांनी देखील युरोपियन संघाचा पाठिंबा दर्शवला आहे. युरोपिय संघामध्ये 27 सदस्य देश आहेत. मात्र 164 सदस्य देश असलेल्या जागतिक व्यापार संघटनेतील कोणीही एक देश या निर्णयाला अटकाव करू शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.