लाहोर – पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी झालेल्या झुंडहत्येचे समर्थन यूट्युबवरून केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने 27 वर्षीय युवकाला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या युवकाने एका व्हिडिओतून हे समर्थन केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याची दखल घेऊन या युवकावर कारवाई केली आहे.
पाकिस्तानात गेल्यावर्षी 3 डिसेंबर रोजी श्रीलंकेच्या एका नागरिकाची कट्टरवादी जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. कट्टरवादी तेहरिक-ए-लबाईक पाकिस्तान या कट्टरवादी संघटनेच्या तब्बल 800 जणांच्या जमावाने सियालकोट जिल्ह्यातील एका वस्त्रोद्योग फॅक्टरीवर हल्ला केला होता आणि या फॅक्टरीचे मॅनेजर असलेल्या प्रियांथा कुमारा यांची हत्या केली होती.
प्रियांथा कुमारा यांचा मृतदेहही जमावाने पेटवून दिला होता. सियालकोटमधील मोहम्मद अदनान याने आपल्या यूट्युब चॅनेलवर या घटनेचे समर्थन केले होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आणि गुर्जेनवाला दहशतवादविरोधी न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले, मोहम्मद अदनान याला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पाकिस्तानात झुंडहत्येचे यूट्युबवरून समर्थन
27 वर्षीय युवकाला एक वर्षाची शिक्षा
लाहोर, दि. 22 – पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी झालेल्या झुंडहत्येचे समर्थन यूट्युबवरून केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने 27 वर्षीय युवकाला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या युवकाने एका व्हिडिओतून हे समर्थन केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याची दखल घेऊन या युवकावर कारवाई केली आहे.
पाकिस्तानात गेल्यावर्षी 3 डिसेंबर रोजी श्रीलंकेच्या एका नागरिकाची कट्टरवादी जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. कट्टरवादी तेहरिक-ए-लबाईक पाकिस्तान या कट्टरवादी संघटनेच्या तब्बल 800 जणांच्या जमावाने सियालकोट जिल्ह्यातील एका वस्त्रोद्योग फॅक्टरीवर हल्ला केला होता आणि या फॅक्टरीचे मॅनेजर असलेल्या प्रियांथा कुमारा यांची हत्या केली होती. प्रियांथा कुमारा यांचा मृतदेहही जमावाने पेटवून दिला होता. सियालकोटमधील मोहम्मद अदनान याने आपल्या यूट्युब चॅनेलवर या घटनेचे समर्थन केले होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आणि गुर्जेनवाला दहशतवादविरोधी न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले, मोहम्मद अदनान याला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.