पगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या  

पिंपरी (प्रतिनिधी) – ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) घडली.

रविंद्र प्रताप सिंग (वय ४५, मूळगाव उत्तरप्रदेश) असे गळफास घेतलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रविंद्र सिंग हे सीएमई येथे सुरु असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते.

त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनस्थावर एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. वीरेंद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.