सुपरशेअर: अरॅमको

जगातील सर्वांत फायदेशीर कंपनी (बिलियनणड 111), म्हणजे ऍपल पेक्षाही दुप्पट नफा कमावणाऱ्या अशा सौदी अरेबियाच्या सरकारच्या मालकीच्या अजस्त्र सौदी अरॅमकोनं आपली प्राथमिक समभाग विक्री (खझज) चालू केलेली आहे.

कंपनी त्यासाठीची किंमत ही 5 डिसेंबर रोजी जाहीर करणार आहे. व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी 28 नोव्हेंबर हा अर्जाचा शेवटचा दिवस आहे तर संस्थात्मक मोठ्या गुंतवणूकदारांसाठी 4 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे.

कंपनी सध्याच्या भागभांडवलापैकी केवळ अर्धाच टक्का विक्रीस काढत असून देखील हा आयपीओ आतापर्यंतचा जगातील सर्वांत मोठा आयपीओ ठरू शकतो (बिलियन णड 40). आतापर्यंत ही बिरुदावली चीनची ‘अलीबाबा’ ही कंपनी मिरवत आलीय (बिलियन णड 25).

अपेक्षा आहे की, सौदी अरेबियाच्या टॅडवुल या स्टॉक एक्‍स्चेंजवर या कंपनीची नोंदणी झाल्यानंतर ही जगातील सर्वांत मोठी कंपनी म्हणजे सध्याच्या ऍपल, अल्फाबेट (गूगल), मायक्रोसॉफ्ट व ऍमेझॉन पेक्षाही मोठी ठरेल. या आयपीओसाठी सिटीग्रुप, क्रेडिट स्वीस, गोल्डमन सॅक्‍स, एचएसबीसी, जेपी मॉर्गन, इ. सारख्या आर्थिक विश्वातील दिग्गज कंपन्या सरसावल्या आहेत.

जरी या आयपीओमधून कंपनी उभा करीत असलेल्या पैशाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत तरी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेस अधिक उभारी देणं हेच उद्दिष्ट जगासमोर मांडलं जातंय !भारतीय गुंतवणूकदारांना या कंपनीच्या आयपीओमध्ये भाग घेण्यासाठी सरकारच्या एलआरएस (ङळलशीरश्रळीशव ठशाळीींरपलश डलहशाश) हा पर्याय उपलब्ध आहे ज्याद्वारे अडीच लाख अमेरिकन डॉलर्सपर्यंत थेट गुंतवणूक करता येऊ शकते.

अथवा दुसरा पर्याय म्हणजे असा भारतीय म्युच्युअल फंड शोधणे जो या आयपीओ द्वारे या कंपनीत गुंतवणूक करत आहे उदा. (घीेंरज्ञ श्रेलरश्र एाशीसळपस चरीज्ञशीं र्ऋीपव व ऋीरपज्ञश्रळप एर्िींळीूं).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)